प्रतिनिधी / पणजी
गोव्याचे माजी महसूल मंत्री आणि अपक्ष आमदार रोहन खवंटे यांना बुधवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी अटक केली. भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हाम्बरे यांना धमकी दिल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी त्यांना अटक करून पहाटे जामिनावर त्यांची सुटका केली. गोवा विधानसभेचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन काळात आमदाराला अशा कथित धमकी प्रकरणी अटक होण्याची ही गोव्यातील अलीकडील काळातील पहिलीच वेळ आहे. आपण विधानसभा प्रकल्पात बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री सावंत यांना भेटण्यासाठी गेलो असता आमदार रोहन खवंटे यांनी प्रकल्पातील वाटेतच आपल्याला धमकावले अशी तक्रार भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हाम्बरे यांनी बुधवारी रात्री पोलिसात केली होती. आपण पत्रकार परिषद घेऊन आमदार खवंटे यांच्यावरील मालमत्ता विषयी बोललो होतो. ते पणजीतील त्यांच्या कंपन्यांच्या कार्यालयाबाबत महापालिकेला फक्त पाचशे रुपये जमा करतात असे मी म्हटले होते, याविषयी खवंटे यांनी मला धमकावले माझा हात यांनी पकडला व तुमच्या आई–वडिलांपासूनच्या मालमत्ता मी पाहून घेतो ,असे खवंटे मला बोलले. अशी तक्रार म्हाम्बरे यांनी सभापतींकडे केली व पोलीसातही धाव घेतली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी रात्री पत्रकार परिषद घेऊन व सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली होती. खवंटे यांची दादागिरी जास्त झाली म्हणूनच त्यांना मंत्रिमंडळातून अलीकडेच वगळण्यात आल्याचे तानावडे म्हणाले होते. भाजपचा आक्रमक पवित्रा पाहता खवंटे यांना पोलिस अटक करतील असे संकेत मिळू लागले होते. सभापतींच्या परवानगीनंतर पोलिसांकडून रात्री उशिरा त्यांना अटक झाली. आज गुरुवारी अधिवेशनात हा विषय गाजण्याची शक्यता आहे.
Trending
- घरगुती धार्मिक कार्यासाठी बिहारचे राज्यपाल आले दोडामार्गात !
- आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वात मालवणात खळा बैठका !
- पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी
- काँग्रेसचा जनतेच्या संपत्तीवर डोळा
- टीका, आरोपांना सक्षम प्रत्युत्तर द्या
- मन आणि तनही भाजपमय !
- गोवा डेअरीच्या 14 संचालकांची अपात्रता कायम
- अब की बार…मोदी हद्दपार! संजयबाबा घाटगेंचा खरमरीत इशारा