प्रतिनिधी/ मडगाव
गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पुढाकाराने शनिवारी मडगावच्या लोहिया मैदानावर ‘ओन्ली गोल से नो टू कोल’ या बॅनरखाली आयोजित केलेल्या जाहीर सहभेत एकूण 9 ठराव घेण्यात आले. त्यात गोव्याच्या हिताआड प्रकल्प आणल्यास त्या प्रकल्पाना विरोध केला जाईल तसेच त्यासाठी आंदोलन झाल्यास त्यात काँग्रेस पक्षाचा सहभाग असेल असा ठराव घेण्यात आला.
लोहिया मैदानावरील सभेतील ठराव पुढील प्रमाणे : गोवा आणि पर्यावरणाची ओळख संरक्षित करण्यासाठी लोकांचा आवाज बनविण्याचा संकल्प करते. राज्यातील पर्यावरण, वन आणि वन्यजीव जपण्यासाठी सर्व निषेध, आंदोलनात आपला सहभाग कायम ठेवण्यासाठी संकल्प करण्यात आला.
इतर राज्यांतील कोळशावर आधारित उद्योगांची गरज भागवण्यासाठी कोळसा साठा करण्यासाठी गोव्यामध्ये कोळसा केंद्र उभारण्याच्या योजनेला तीव्र विरोध दर्शविला जाईल.
वास्को-डा-गामा ते होस्पेट पर्यंत रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण लावण्यास विरोध, मुरगांव बंदरातून केवळ कोळशाची वाहतूक करण्यासाठी रेल्वे मार्गाच्sा दुपदरीकरण केले जात आहे. कर्नाटक व महाराष्ट्रात असलेल्या उद्योगासाठी हा कोळसा गोव्यात आणला जातो. केवळ कोळशाची वाहतूक करण्यासाठीच रेल मार्गाचे दुपदरीकरण केले जाते त्याला विरोध कायम ठेवणे.
केवळ कोळसा वाहतुकीसाठी एक्सप्रेस वे स्थापित करणे आणि आरोग्यास धोका निर्माण करणे तसेच गोव्याची ओळख नष्ट केली जाणार असल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या विस्ताराला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरण वन आणि वन्यजीव नष्ट न करता सरकारने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले इतर पर्याय शोधले पाहिजेत अशी मागणी देखील ठरावातून करण्यात आली आहे.
मोले येथे पॉवर ट्रान्समिशन लाईन टाकण्यास विरोध दर्शविते ज्यामुळे झाडे, जैवविविधता आणि पर्यावरण नष्ट होईल. सरकारने पर्यावरण वन आणि वन्यजीव नष्ट न करता त्यांच्याकडे उपलब्ध असलेले इतर पर्याय शोधले पाहिजेत.
भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आणि मोले नॅशनल पार्कमधून जैवविविधतेचा मोठय़ा प्रमाणात नाश होत आहे. या तीनही प्रकल्पांवर सार्वजनिक सुनावणी घेण्याची मागणी या जाहीर सभेतून करण्यात आली.