प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील 7 अधिकाऱयांना आयएएस वर्गात (पॅडर) बढती देण्यात आली असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सर्वश्री मिनिनो डिसोझा, नारायण सावंत, संजित रॉड्रीग्स, संजीव गडकर, यतींद्र मराळकर, प्रसाद लोलयेकर व मायकल डिसोझा यांचा त्यात समावेश आहे. त्यांनी गोव्यातील विविध खात्यात महत्वाची पदे भुषवली असून अनेक जबाबदाऱया यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. सध्या ते विविध खात्यात उच्च अधिकारी पदावर कार्यरत आहेत. बढतीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.