प्रतिनिधी / बांदा:
गोवा बनावटीच्या दारूची नागपूरच्या दिशेने बेकायदा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्कच्या सांगलीच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूचे 44 लाख 61 हजार 660 रुपये किमतीचे 877 बॉक्स व 20 लाख किमतीचा कंटेनर, मोबाईल असा एकूण 64 लाख 71 हजार 630 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर या प्रकरणी पंजाबराव बाबुराव लोखंडे( वय 49 साईनगर भारतनगर नागपूर) याच्यावर बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुंन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई इन्सुली तपासणी नाक्यासमोर करण्यात आली.