बांदा / प्रतिनिधी-
गोव्यातून थेट राजस्थानकडे वाहतूक करण्यात येणारी गोवा बनावटीची तब्बल 18 लाखांची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने इन्सुली येथे पकडली आहे.तर 6 लाख किमतीचा कंटेनर व 50 हजार रुपयाचे मोबाईल असा एकूण 24 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला.याप्रकरणी घेवरचन्द बिष्णोई (वय.30,रा राजस्थान) यास ताब्यात घेतले. या कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या विशेष कृती दल व इन्सुली तपासणी नाका यांनीही कारवाई रात्री तीन वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्कच्या तपासणी नाक्या समोर करण्यात आली.