भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
गोव्यात नोकरीला जाणाऱया युवक-युवतींचा मार्ग आता मोकळा होणार आहे. आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्हय़ातील आमच्याकडे नोंदणी झालेली यादी त्यांच्याकडे सादर केली. सदर व जिल्हाधिकाऱयांकडील दोन्ही यादी गोवा सरकारकडे पाठविली आहे. त्यामुळे गोवा प्रवेशाचा प्रश्न लवकरच सुटणार आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी माजी आमदार प्रमोद जठार व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेंगुर्ले किनारपट्टीवर पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर आदी उपस्थित होते. जिल्हय़ातील गोव्यात नोकरीला असलेल्या प्रवेशासंदर्भात सुमारे 4 हजार लोकांची नोंदणी झाली होती. त्यानुसार प्रशासनास यादी पाठविण्यात आल्याचे तेली यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील बाजारपेठा शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सुरू आहेत, परंतु हा वेळ वाढवावा याबाबत आम्ही व्यापारी जिल्हाध्यक्ष यांच्याशी बोलून जिल्हाधिकारी यांच्याकडे दुकानांची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी माहिती प्रसिद्ध करतील, असे जठार यांनी सांगितले.