प्रतिनिधी /पणजी
बिर्ला कंपनीचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यानी आता गोव्यातही बिर्ला मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. काल गुरुवारी व्हर्च्युअल माध्यमाद्वारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी वाहतकूमंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत या नव्या मंदिरासाठी भूमिपूजन केले.
बिर्ला कंपनीतर्फे दिल्ली, नाशिकसह देशातील अनेक भागात भगवान श्रीकृष्णाची आकर्षक मंदिरे उभारण्यात आलेली आहेत. गोव्यात उभरण्यात येत असलेले हे मंदिरही भव्य स्वरुपाचे आहे. या प्रकल्पावर 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार आहे.
सांकवाळ येथे सुमारे 4 एकर परिसरात या पवित्र मंदिराची स्थापना होणार आहे. 18 महिन्यांमध्ये विक्रमी वेळेत या मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार आहे. हा मंदिर प्रकल्प ‘मन्ननम ट्रस्ट’तर्फे उभारला जाणार आहे. या ट्रस्टचे चेअरमन स्वतः कुमार मंगलम हेच आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.