सावंतवाडी:
कोल्हापूरहून गोव्याकडे मैदा घेऊन जाणारा मालवाहक ट्रक मुंबई-गोवा महामार्गावरील माजगाव साधले हॉटेलजवळील वळणावर वीज खांबाला धडक देत उलटला. सुदैवाने चालक व तेथील बस्त्याव परेरा यांचे घर बचावले. हा अपघात मंगळवारी पहाटे अडीच वाजता घडला. अपघातामुळे वीज खांब, वाहिन्या तुटल्याने वीज वितरणचे मोठे नुकसान झाले. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
कोल्हापूर येथून मैदा घेऊन ट्रक गोव्याकडे जात असता माजगाव साधले हॉटेलजवळ चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्यालगत असलेल्या वीज खांबाला धडक देत ट्रक उलटला. अपघाताच्या आवाजाने तेथील बस्त्याव परेरा यांच्या घरातील कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. वीज वाहिन्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. परेरा यांच्या अंगणातील माडाला ट्रक अडकून राहिल्याने घराचा दर्शनी भाग बचावून कुटुंबीय बालंबाल बचावले. चालक व क्लिनरला किरकोळ दुखापत झाली. ट्रकचे व वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. या भागातील वीजपुरवठाही खंडित झाला. घटनास्थळी पोलीस कर्मचारी प्रसाद कदम, कांबळी यांनी धाव घेतली. मंगळवारी दुपारी मैद्याची पोती बाहेर काढण्यात आली. वीजसेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू होता. ��-��w[]?�?��߫��UʅD���)#�k��� 돵�S��J^��u�c�B߈���