प्रतिनिधी/ मडगांव
कोमलजिंदाल डॉट कॉम (www.komaljindal.com) या संकेत स्थळावरून मडगाव, बाणावली आणि कोलवा येथे महाविद्यालयीन मुली, महिला, एस्कोर्ट मुली तसेच कॉर्ल गर्ल उपलब्ध असल्याची जाहीरात करण्यात आली असून हा उघडरित्या चाललेला ऑनलाईन वेंशा व्यवसाय गोव्याची बदनामी करणारा गोवा वुमन्स फोरमने त्याला तीव्र हरकत घेतली असून या संकेत स्थळांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसे निवेदन दक्षिण गोव्याचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे तसेच मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांना सादर करण्यात आले आहे.
या संकेत स्थळांवर काही तरूण तसेच महिलाचे फोटो टाकण्यात आले असून त्याची थोडक्यात माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. त्याच बरोबर भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहेत. ग्राहकांनी त्यावर संपर्क साधायचा व आपल्याला पाहिजे असलेली तरूणी किंवा महिला निवडायची असा मजूर पण त्यात देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अशा प्रकारच्या संकेत स्थळावरून लैंगिक पर्यटनाला चालना देण्यात आली असल्यास मडगाव शहर आणि बाणावली व कोलवा या पर्यटन स्थळांची तसेच सासष्टी तालुक्याची प्रतिमा व कौटुंबिक जीवनावर याचा गंभीर परिणाम होईल असे गोवा वुमन्स फोरमने म्हटले आहे. संकेत स्थळावर उलपब्ध असलेली लेखी माहिती व छायाचित्रे या संदर्भात मडगाव व कोलवा पोलीस स्थानकावर एफआयआर दाखल करावा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे.
संकेत स्थळाच्या विरोधात ठराव घ्या
मडगाव पालिका मंडळ तसेच बाणावली व कोलवा पंचायतीने आपल्या बैठकीत या संकेत स्थळाच्या विरोधात ठराव घेऊन त्याची प्रत राज्याच्या पोलीस महासंचालकांना सादर करावी अशी विनंती व सूचना गोवा वुमन्स फोरमने केली आहे. गोव्यातील महाविद्यालयीन तरूणी, गृहिणी तसेच इतर महिलांची बदनामी करणाऱया या संकेत स्थळावर कायद्याने बंदी घालणी व इतर सर्व कायदेशीरबाबी करणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी सरकारी यंत्रणेने गांभीर्याने पावले उचलणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, या संकेत स्थळावर भेट दिल्यानंतर गोव्यात कुठल्या भागात महाविद्यालयीन युवती, गृहिणी तसेच एस्कोर्ट तरूणी कुठे भेटणार याची सविस्तर माहिती उपलब्ध होत असते. यावरून गोवा हे ‘सेक्स टुरिझम डेस्टिनेशन’ असल्याचे चित्र उभे करण्यात आले आहे. हा प्रकार खुपच गंभीर असून या प्रकरणी सरकार कोणती कारवाई करते हे याकडे आत्ता सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.