प्रतिनिधी/ कारवार
विधानसभेत गोहत्या बंदी (कर्नाटक पशू हत्या प्रतिबंधक आणि संरक्षण विधेयक 2020) संमत पसरले आहे. विधेयकाचे अनेकांनी जोरदार स्वागत केले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे अभिनंदन केले आहे. स्वागत आणि अभिनंदन करण्याच्या बाबतीत भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, बजरंग दलाचे, हिंदू जागरण मंचच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अन्य हिंदुत्त्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आघाडीवर राहिले आहेत.
गोहत्या बंदी विधेयक संमत झाल्याने कारवार नगर भाजपतर्फे आज येथील सोनारवाडा येथील शिवनाथ मंदिरात गो-पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष नागराज नायक आणि जिल्हा भाजप प्रधान कार्यदर्शी एन. एस. हेगडे म्हणाले, अनेक वर्षानंतर आमचे मोठे स्वप्न साकार झाले आहे. कधी कधी उघडपणे तर कधी कधी चोरून गो-मातेची हत्या करणाऱयांनी आता सावध झाले पाहिजे. अन्यथा हत्याऱयांची आता कायद्याशी गाठ पडणार आहे. यावेळी नगरसेविका माला हुलूसवार, संध्या बाडकर, रोषणी मालसेकर, नगरसेवक उल्हास कणी, प्रेमानंद गुणगा, हनुमंत तळवारसह रामदास अणवेकर, चंद्रहास कुडतरकर, सदानंद भट, विवेक भावीकेरीकर, अशोक कामत, निशा नायक, नागराज शेट, विनायक दुधाळकर, समृद्धी दुधाळकर, अनमोल रेवणकर, संदेश शेट्टी, किसन कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी मिठाईचे वितरण करून आनंद व्यक्त करण्यात आला. कारवार शहर भाजपचे अध्यक्ष नागेश कुर्डेकर यांनी आभार मानले.
यल्लापूर येथेही विशेष पूजा
कर्नाटक सरकारने गुरुवारी विधानसभेत गोहत्या बंदी विधेयक संमत केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील विश्व हिंदू, परिषदेतर्पे विशेष गो-पूजेचे आयोजन केले होते. यल्लापूर येथील श्री महागणपती देवालयाच्या आवारात गो-मातेचे पूजन केल्यानंतर मिठाईचे वितरण करून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी गोपाळकृष्ण जी. गावकर, भाजपचे युवा नेते विवेक हेब्बार, यल्लापूर नगरपंचायत अध्यक्षा सुनंदा दास, उपाध्यक्षा शामकी पाटणकर, विश्व हिंदू परिषदेचे आणि भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
विधेयकाची अंमलबजावणी कडक करा
दरम्यान गोहत्या बंदी विधेयकाची अंमलबजावणी कडक करण्याची मागणी अनेक जिल्हावासियांकडून केली जात आहे. अनेकजण विधेयकातील पळवाटांचा लाभ उठवत पूर्वीप्रमाणे गोमातेची हत्या करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशांच्या विरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे.