सचिवपदी श्रीनिवास रायबागी
प्रतिनिधी /बेळगाव
गोवा येथे राऊंड टेबल इंडिया बीसीआरटी 237 या संघटनेच्या आठव्या सर्वसाधारण सभेत गौरव देसाई यांची चेअरमनपदी तर श्रीनिवास रायबागी यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
राऊंड टेबल इंडिया बीसीआरटी 237 या संघटनेची नुकताच आठवी सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत माजी चेअरमन नितीन काटवा व सुदर्शन जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावषीच्या नूतन चेअरमनपदी गौरव देसाई, उपचेअरमन राजू दोड्डणावर, सचिवपदी श्रीनिवास रायबागी तर खजिनदारपदी सिद्धार्थ हेडा यांची निवड करण्यात आली.
यावेळी रोहित देसाई, नंदन भंडारी, राहुल रायबागी, अश्वीन माचा, ध्रुव पटेल, अजिंक्मय कालकुंद्रीकर आदी उपस्थित होते. निवडलेल्या नूतन कार्यकारिणीने पुढील दोन वर्षांत वेगवेगळे उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली.