व्हनाळी / सागर लोहार
जेष्ठा गौरी आवाहन येत्या रविवारी 12 सप्टेंबर या दिवशी होणार आहे. यंदा हवामानातील बदल आणि दमदार पावासाच्या कोसळधारेमुळे गत दोन वर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामीण भागातील डोंगर माध्यावर, रस्त्याच्या दुतर्फा, शेताच्या बांधावर फिकट गुलाबी रंगाच्या फुलांनी बहरणारी गौर वनस्पती यंदा अत्यल्प प्रमाणात फुलली आहे. त्यामुळे गौर-गणपती सणात मानाची पुजनीय स्थान असलेली गौर वनस्पती दुर्मिळ झाल्याने यंदा पुजेसाठी महिलांना गौर वनस्पती शोधावी लागत आहे.
लहान मुले, युवक, आबालवृध्द महिला माहेरवाशींनिंचा आवडीचा सण म्हणजे गौरी-गणपती. पुजनासाठी गौर वनस्पतींना फार मोठी मागणी असलेली गौर वनस्पती यंदा दुर्मिळ झाली आहे. शिवाय कांही ठिकाणी महिनाभर अगोदरच बहरलेली मानाची गौर वनस्पती पावसाच्या आती माऱयामुळे फक्त या वनस्पतीचे सडच शिल्लक राहिले आहेत.
निर्सगातील वनस्पतींचा औषधी व धार्मिक वापर
भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गातील अनेक वनस्पतींचा औषधी व धार्मिक वापरासाठी उपयोग हा ज्या त्या सणानिमित्त करतात. तुळस, बेल, जासवंद, हराटी, आगाडा, लिंब, म्हाका, शंकरोबा, ऊस व कर्दळ या सर्वच वनस्पतींना ज्या-त्या कालावधीत सणानिमित्त पुजनिय देव्हाऱयात अनन्यसाधारण महत्व लाभले आहे.