बॉलिवूडमध्ये सद्यकाळात अनेक स्टार किड्स चर्चेत आहेत. यात सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना कायमच विविध कारणांमुळे चर्चेत राहेत. शनिवारी सुहानाचा वाढदिवस होता आणि ती आता 21 वर्षांची झाली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सुहानावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.
सुहानाची आई गौरी खानच्या पोस्टने यात सगळय़ांचे लक्ष वेधून घेतले आहे. गौरीने सोशल मीडियावर सुहानाचे एक सुंदर छायाचित्र शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गौरीने शेअर केलेल्या छायाचित्रात सुहाना एका खूर्चीवर बसलेली दिसून येत आहे. यात तिने पोलका डॉट ड्रेस परिधान केला आहे. ‘तुझ्यावर आज..उद्या आणि कायमच पेम राहणार’ असे गौरीने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. तर गौरीच्या पोस्टवर सुहानानेही प्रतिक्रिया दिली आहे.
गौरीच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी कमेंट करत सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री नीलम कोठारी, सीमा खान, भावना पांडे, संजय कपूर यांचा यात समावेश आहे. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये फिल्म मेकिंग आणि अभिनयाचे शिक्षण घेत आहे. सोशल मीडियावर सुहाना चांगलीच सक्रीय असून तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सुहानाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.