प्रतिनिधी / शिरोळ
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सार्वजनिक ग्रंथालयाच्या सहाय्यक अनुदानाचा पहिला हप्ता राज्यातील सर्व ग्रंथालयांनावितरीत करण्यात येणार असल्याने ग्रंथालयांना अच्छे दिन आले असल्याची माहिती तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष एम. एस. माने यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यामध्ये शासनमान्य 12 हजार आठशे ग्रंथालय आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 860 तर शिरोळ तालुक्यात 42 ग्रंथालयांना याचा लाभ होणार आहे. सन 2020-21 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून सन 2019-20 थकीत रकमेपोटी 10% रक्कम 12 कोटी 37 लाख 50 हजार रुपये वितरित केली जाणार आहे. राज्यातील ग्रंथालयाचे सन 2019-20 रूपये 32 कोटी 29 लाख थकीत आहे चालू वर्षी आर्थिक वर्षामध्ये 123 कोटी 75 लाख रुपये चा निधी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आला आहे. या निधी मधूनच मागील थकबाकी पोटी दहा टक्के प्रमाणे बारा कोटी सदतीस लाग 50 हजार रुपये वितरित करण्याचे आदेश राज्याच्या अवर सचिव अ. म. बाविस्कर यांनी परीपत्रकाद्वारे कळविले असल्याचे एम. एस. माने यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने सन 2019-20 मध्ये शासनमान्यता सार्वजनिक ग्रंथालयाचे देय असलेली थकित रक्कम मिळणार असल्याने वाचनालयातील कर्मचाऱ्यांचा पगार दैनिक साप्ताहिक मासिक यांची थकीत असलेली बिले अदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.