ऑनलाईन टीम / पुणे :
ज्येष्ठ महिन्यातील गणेश जन्मानिमित्त चाफा, मोगरा, जरबेरा, गुलछडी, बिजली, झेंडू इत्यादी फुलांनी ग्रामदैवत कसबा गणपतीला सुरेख सजावट करण्यात आली.
मुद्गल पुराणात आलेल्या उल्लेखात असे म्हणले आहे की ज्येष्ठ गणेश जन्म म्हणजेच शेषपुत्र मूषकग जन्म हा अंगारकी चतुर्थीस झाला होता आणि योगायोगाने ज्येष्ठ शुद्ध अंगारकी चतुर्थी यंदा एकाच दिवशी आल्याने हा दुर्मिळ योग साधत गणेशाला फुलांची पोशाख पूजा करण्यात आली.
ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानतर्फे गणपती मंदिरात पारंपरिक पद्धतीने गणेशजन्म सोहळा पार पडला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे मोजक्या भाविकांसोबत सोशल डिस्टन्सिंग पाळून गणेशजन्म संपन्न झाला. तसेच परंपरेनुसार रात्रीही श्रीं ची महाआरती, छबिना करून गणेशजन्म सोहळा साजरा करण्यात आला.
मंदिरात ज्या वहिवाटदार पुजा-यांकडे हा महिना सेवेचा असतो, त्यापैकी यंदा आशापूरक उर्फ प्रमोद ठकार यांनी श्री गणेशाची पूर्ण पोषाखाने पूजा साकारली.