तालुक्यात 276 केंद्रावर इव्हीएम मशीनद्वारे मतदान
प्रतिनिधी / सातारा
जिह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज शुक्रवार दि. 15 रोजी मतदान होणार आहे. रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची आज खरी परिक्षा आहे. यामुळे सगळयांचे लक्ष मतदान राजाकडे वेधले आहे. तालुक्यात 276 केंद्रावर मतदान फॉर्म आणि इव्हीएम मशीन तसेच अत्यावश्यक साहित्य दाखल झाले आहे. कोरोनाच्या अनुशंगाने विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोरोनाचाबाधितांची संख्या कमी जास्त होत आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीवर यांचा कोणताही परिणाम झालेला नाही. कोरोनाची भीती न बाळगता पुरूष तसेच महिला उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू ठेवला होता. गावापातळीवर होणाऱया या निवडणुकीची उत्सुक्ता उमेदवार ते गट, तट, राजकीय पक्ष यांना लागून राहिलेली आहे. मतदानाच्या एक दिवस आधी प्रशासनाने तयारी सूरू केली होती. आज शुक्रवारी तालुक्यातील 276 पेंद्रावर मतदान होत आहे. यासाठी मतदान फॉर्म, इव्हीएम मशीन केंद्रावर पोहचल्या आहेत. या केंद्रावर 276 पथके आहेत. जी संपूर्ण मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत.
पोलीस ही या ठिकाणी तैनात आहेत. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार सकाळी 7.30 नंतर मतदानाला सुरूवात होणार आहे. आधी नियमाप्रमाणे मॅकपोल घेवून सर्व यंत्रणा सुरळीत आहे का ? यांची तपासणी निवडणूक अधिकारी व कर्मचारी करणार आहेत. दिवसभरात 900 जणांचे मतदान एका केंद्रावर होणार आहे. इव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास जादाच्या 40 इव्हीएम मशीनची सोय करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंदावर आरोग्य विभागातील एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. मास्क, सॅनिटायझर, वापर बंधनकारक आहे.