वार्ताहर /परळी
आरोग्य विभाग व बनघर ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ सरपंच पूजा गुजर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. दरम्यान 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्यावतीने आरोग्य विभागाकडे लसीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या पाठपुराव्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे परळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचायांनी यशस्वीपणे लसीकरण मोहीम राबवली. या लसीकरण मोहिमेत 45 वर्षे वयोगटातील 74 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. उर्मिला बनगर, आरोग्य सामुदायिक अधिकारी डॉ. रोहिणी सुर्वे, उपसरपंच भिकाजी सावंत, सदस्य हरिबा गुजर, आरोग्य सेवक महेश भोसले, आशा शिंदे, शिरीष सपकाळ, अक्षय मोरे आदी उपस्थित होते.