वारणानगर / प्रतिनिधी
सातवे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या कक्षेतील गांवात ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांना अकरा लाख रू. चा निधी देण्याची घोषणा सातवे जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य शिवाजीराव मोरे यांनी केली आहे.
निवडणूकीच्या माध्यमातून गटातटात होणारे तणाव कमी व्हावेत तसेच ग्रामस्थांना यामुळे होणारा त्रास कमी व्हावा गावातील एकोपा टिकून राहावा कोरोनाचे संकट बळावू नये कोरोनासी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावर ताण येऊ नये आणि निवडणूक खर्चाची बचत व्हावी यासाठी निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांना निधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सदस्य श्री. मोरे यानी सांगीतले.
गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका अटीतटीच्या होतात निवडणूकी नतंर पाच वर्ष विरोधात असलेल्या गटातील उमेदवार सदस्य तसेच कार्यकर्ते विकास कामात अडथळा आणतात ग्रामसभा ताणतणावात होतात संघर्ष वाढतच रहातो या सर्वांवर सर्वांनी एकत्र येवून सामंजस्य दाखवून निवडणूका बिनविरोध झाल्यातर गावा – गावातील संघर्ष संपून विकास कामे गतीने होतील यासाठी निवडणूका बिनविरोध व्हाव्यात यासाठी खास निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सदस्य श्री. मोरे यांनी सांगीतले.
सातवे मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडेल त्या गावांना जिल्हा परिषदेच्या स्वनिधी किंवा इतर फंडातून ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, असे सदस्य शिवाजी मोरे यानी सांगीतले.
सातवे जिल्हा परिषद मतदार संघात जाफळे,मोहरे,सातवे, आरळे, बच्चे सावार्डे, पैजारवाडी, आवळी,देवाळे या आठ गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका आहेत यातील किती गावांच्या निवडणूका बिनविरोध होतील याचा निर्णय नेत्याच्या समन्वयावर देखील अवलंबून आहे.