प्रतिनिधी / कोल्हापूर
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची जिल्हा बँकेवर कागल तालुका सेवा संस्था गटातून बिनविरोध निवड झालेली आहे त्यांच्या विरोधात अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे त्यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवड बिनविरोध झालेली आहे.
या बिनविरोध निवडीमागे कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची जोड दिली जात आहे. यापूर्वी गगनबावडा तालुक्यातून पालकमंत्री सतेज पाटील बिनविरोध झाले आहेत. आत्तापर्यंत दोन जागा बिनविरोध झाल्या असून उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत होती.
मंत्री मुश्रीफ यांनी यापुर्वीच जिल्हा बँक निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न सुरु असल्याचे भाष्य केले होते. मात्र सर्वच जागा बिनविरोध होणार नाहीत. असे ही स्पष्ट केले होते. यानुसार उद्या दि. २१ डिसेंबर २०२१ पर्यंत माघार घेण्याची मुदत असणार आहे. यासाठी अद्याप जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील तसेच आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन जागा बिनविरोध झाल्या असुन उर्वरीत जागांसाठी निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.