प्रतिनिधी/ मेढा
जावली तालुक्यातील रांजणी येथील ग्रामसेवकास लॉकडाउनच्या काळात ग्रामपंचायत कार्यालयात मिटिंगमध्ये शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱया राजेंद्र रांजणे याला न्यायालयाने सहा महिने साधी कैदची शिक्षा सुनावली आहे.
रांजणी गावचे ग्रामसेवक दुर्योधन बळीराम शेलार हे करुणा प्रतिबंधक योजनेसंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात मिटिंग घेत होते. यावेळी राजेंद्र रांजणे, गणेश शेलार यांना चप्पलने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कुडाळ पोस्ट पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल होणारा जनरांजनी यांच्याविरोधात दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक चामे यांनी सबळ पुरावे सादर केले. सदर खटला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय यांनी सुनावले. जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सातारा पोलीस उपअधीक्षक ग्रह सातारा विभाग राजेंद्र साळुंखे, तपास अधिकारी चामे व राजे भोसले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.