वार्ताहर/ खानापूर
खानापूर तालुका पत्रकार संघटना तसेच तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा कार्यकर्त्या, पोलीस कर्मचारी यांना ग्रामीण कोटा लिमिटेड संघटनेच्यावतीने मास्क, सॅनिटायझर वितरण कार्यक्रम हाती घेण्यात आला. शुक्रवारी सदर संघटनेच्यावतीने तालुका पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱयांना ग्रामीण कोटा खानापूर घटकचे मंजुनाथ कम्मार, विभागीय व्यवस्थापक दोड्डाप्प्पा होसमणी, महांतेश रायाप्पगोळ, मलिकजान, नागराज, शिवप्रसाद यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुऱहाडे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे, वासुदेव चौगुले, प्रसन्ना कुलकर्णी, कृष्णा भरणकर, शंकर देसूरकर, दत्ता जीवाई, शशी देसाई आदी उपस्थित होते. सदर ग्रामीण कोटा संघटनेच्यावतीने खानापूर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस खाते व विविध कोरोना योद्धाना संघटनेच्यावतीने मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीही हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे शाखा व्यवस्थापक दोड्डाप्पा होसमणी यांनी यावेळी दिली.