कुदेमनी येथे क्रिकेट स्पर्धांना प्रारंभ
वार्ताहर / कुदेमनी
ग्रामीण भागातील युवकांमध्ये जिद्द व ऊर्जा आहे. याचा उपयोग करून कोणत्याही प्रकारच्या खेळामध्ये प्राविण्य मिळविले तर भविष्यात चांगली संधी मिळू शकते, असे विचार चित्रपट दिग्दर्शक गणपत पाटील (सुळगा) यांनी व्यक्त
केले.
कुदेमनी गावातील शिवराय स्पोर्ट्स व बलभीम युवक संघाच्यावतीने आयोजित केलेल्या हाफ पीच प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धांना नुकताच प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी प्रास्ताविक ग्रा. पं. माजी सदस्य गणेश राजगोळकर यांनी केल्यानंतर संघातील कार्यकर्त्यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रा. पं. नवनिर्वाचित अध्यक्षा रेणुका नाईक, सदस्य शांताराम पाटील, शिवाजी मुरकुटे, आरती लोहार यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्या गुरव, आरती लोहार, शामला गुरव, रेणुका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. मल्लाप्पा पाटील, जोतिबा बडसकर, परशराम पाटील, उत्तम पाटील, ईश्वर गुरव, कल्लाप्पा कागणकर, परशराम काकतकर, संजय पाटील, पी. एल. गुरव, ज्ञानदेव गुरव, सुरेश पाटील, रमेश कांबळे, शांताराम गुरव, रवी पाटील, मधू पन्हाळकर, जक्काप्पा पाटील आदींच्या हस्ते विविध फोटो प्रतिमांचे पूजन झाले. ग्रा. पं. सदस्य शांताराम पाटील, शिवाजी मुरकुटे, आरती लोहार, अध्यक्षा रेणुका नाईक यांच्या हस्ते यष्टीपूजन झाले. यानंतर गणपती पाटील व ग्रा. पं. माजी सदस्य काशिनाथ गुरव, लक्ष्मण धामणेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अनेक संघातील खेळाडू, ग्रामस्थ, प्रेक्षक उपस्थित होते. जी. जी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बाळाराम धामणेकर यांनी आभार मानले.