मंगेश तळवणेकर यांचा उपक्रम
प्रतिनिधी / ओटवणे:
गेले दहा महिने कोरोना संकटकाळात जिह्यात खरेखुरे कोरोना योद्धा ठरलेले विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर ग्रामीण भागात शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी पुढे सरसावले आहेत
शाळा सुरू होताच मंगेश तळवणेकर यांनी शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागतच मास्क व सॅनिटायजर देऊन केले. प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा शाळा पूर्वपदावर येऊ पाहत आहेत. यातच संभ्रमावस्थेत असलेल्या पालक व विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत जाण्याविषयी धाकधूक निर्माण झाली आहे. शाळा सुरू करण्याविषयी पहिले सकारात्मक पाऊल शासनाकडून उचलण्यात आल्यानंतर विद्यार्थी व पालकांकडून याला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सर्व नियमांचे पालन करत, स्वसंरक्षण करत शाळेत येता यावे यासाठी माजी शिक्षण आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्रमंगेश तळवणेकर यांनी पुढाकार घेत मास्क व सॅनिटायजर वाटप सुरू केले आहे. या उपक्रमाची सुरुवात सोनूर्ली शाळा नं. 1 पासून करण्यात आली. आतापर्यंत कारिवडेतील कुंभारवाडी शाळा नं. 1, पेडवेवाडी शाळा नं. 2, भैरववाडी शाळा नं. 3, कट्टा शाळा नं. 4, गोसाविवाडी शाळा नं 5 या शाळांमध्ये प्रत्येकी 5 लीटर सॅनिटायजर कॅन व मास्क वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्येही सॅनिटायझरसहित मास्कचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे
कोणीही घाबरून न जाता विद्यार्थ्यांवर दबाव न टाकता, सर्व नियमांचे पालन करत शाळा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मंगेश तळवणेकर यांनी केले. यावेळी कारिवडे गावच्या सरपंच सौ. अपर्णा तळवणेकर, उपसरपंच आलेक्स कोजमा गोम्स, माजी सरपंच लक्ष्मण गावकर, तंटामुक्ती अध्यक्ष तथा ग्रा. पं. सदस्य दादा राऊळ, श्री. परब, मंगेश पंदारे, शंभा खडपकर, श्री. आंबोलकर सर, श्री. राऊळ, रामचंद्र पालव, सत्यवान लिंगवत आदी उपस्थित होते
सोनुर्ली शाळेतही मास्क, सॅनिटायझर वितरण
या शाळेत मंगेश तळवणेकर यांनीसोनुर्ली शाळा नं. 1 मध्ये 5 लिटर सॅनिटायझर तसेच सर्व विद्यार्थ्यांना मास्क दिले. यावेळी भाऊ गावकर, लक्ष्मण देऊलकर, बाळा गावकर, शरद गावकर, उपसरपंच शंकर गावकर, माजी सरपंच प्रणाली गाड, दिगंबर गावकर, श्रीधर कुडतरकर, संकेत गावकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राणे, श्री. चव्हाण, श्री. बांदेकर, सौ. सोनुर्लेकर व आशासेविका उपस्थित होत्या.