बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव असाच होत राहिल्यास मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनानला ग्रामीण भागातील फैलाव रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी ग्रामीण भागात होणारे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील. यासाठी मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित करुन अनावश्यक वाहतुकीला आळा घालता येईल, असे म्हणाले.
गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना कोविड संसर्ग ग्रामीण भागात वाढत आहे. असाच वाढत राहिल्यास नियंत्रणात आणणे कठीण बनेल. त्यासाठी आता पंचायतीत मायक्रो कंटेनमेंट झोन तयार केला जातील, असे त्यांनी सांगितले.
मायक्रो कॅन्टोन्मेंट झोन टप्प्यात कोरोना नियंत्रित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. आम्ही मायक्रो कॅन्टोन्मेंट झोनमध्ये एक समिती तयार करु . त्यामध्ये स्थानिक पोलीस आणि स्थानिक अधिकारी असतील. तसेच लॉकडाऊन आणि अनावश्यक रहदारीला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनावर जबाबदारी सोपवण्यात येत असल्याची माहिती मंत्री बोम्मई यांनी दिली.