आळस झटका अन् कामाला लागा : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून तालुक्यातील अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर आणि उपनगरांत बऱयापैकी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागाकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागाकडे लक्ष देऊन लसीकरण मोहिमेला प्राधान्य द्या, अशा सूचना ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तालुका अधिकाऱयांना केल्या आहेत.
तालुका पंचायतच्या महात्मा गांधी सभागृहात शुक्रवारी आढावा बैठक घेऊन त्यांनी वरील सूचना केल्या आहेत. व्यासपीठावर तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील, उपाध्यक्ष मारुती सनदी, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, तहसीलदार आर. के. कुलकर्णी उपस्थित होते.
कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र तिसऱया लाटेची शक्मयता तज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न होण्याची गरज आहे. शहरात ही मोहीम अधिक तीव्रगतीने राबविण्यात येत आहे. मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी मास्तीहोळी यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगून तातडीने यापुढे लसीकरण मोहीम जलदगतीने राबवावी, अशी सूचना केली.
अधिकाऱयांच्या कारभारामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास होत आहे. कोणत्याही कार्यालयात गेल्यास त्यांची कामे न करता त्यांना पळापळ लावण्यातच अधिकारी धन्यता मानत आहेत. त्यामुळे यापुढे अशाप्रकारे नागरिकांची गैरसोय केल्यास गय केली जाणार नाही, असे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱयांना सुनावले आहे.
बैठकीला तालुका पंचायतीचे साहाय्यक सचिव राजेंद्र मोरबद, श्रीधर सरदार, पीडीओ एम. जी. बरगी, प्रकाश नाईक, सुनीता पाटील, लीला मेत्री, वैजनाथ सनदी आदी उपस्थित होते. यावेळी काही अधिकाऱयांनी अडचणींबाबत माहिती दिली. त्या तातडीने सोडविण्यात येतील, असेही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.