हलाखीची गरिबी प्रवासातून घडलेला ग्रामिण शिक्षक : शिक्षणासाठी ध्येयवेडय़ाने घेतला आदिवासी गाव दत्तक
वार्ताहर /सावईवेरे
ग्रामीण भागातील एका हुरहुन्नरी शिक्षकाचे खडतर प्रवासानंतरही शिक्षक होण्याचे स्वप्न अधुरे राहते. त्या दिवसापासून त्याने आपल्यासारख्या अन्य कोणत्याही विद्यार्थ्यांचे स्वप्न अधुरे राहू नये याची विशेष काळजी घेतली. आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिकवण घेऊ न शकणाऱयासाठी शिकवण्या देण्याचे काम विनामुल्य तर काहींना अल्पदरात सुरू केले. आज त्यांनी घडविलेले विद्यार्थी मोठया हुद्दावर काम करीत आहेत तर काही त्याच्यासारखेच इतरांना अध्यापनाचे धडे देत आपल्या क्षिक्षकाचा कित्त्ता गिरवत आहे. ग्रामिण भागातून ज्ञानार्जन करीत इतरांना सुशिक्षित बनविण्याचे ध्यास घेतलेले ते शिक्षक म्हणजे गाळवाडा प्रियोळ येथील डॉ. अशोक कृष्णा प्रियोळकर!
ग्रामीण शिक्षक डॉ. प्रियोळकर यांना सामर्थ्य ग्लोबल शेष्ठत्व 2020 व ग्लोबल टीचर आदर्श 2021 असे दोन ग्लोबल पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तर नुकताच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय, विलक्षण कामगिरी केल्याबद्दल श्री नारायण मानव सेवा समितीतर्फे नारायण सामाजिक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी जयपूर-राजस्थान येथील बीएम बिर्ला सभागृहात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. हल्लीच त्यांना समाजशास्रात पीएचडी प्राप्त झाली असून चैनई येथे झालेल्या दिक्षांत समारंभात त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली.
हलाखीच्या परिस्थितीला हरवत पीएचडीपर्यंत शिक्षण
अशोक प्रियोळकर यांनी एमए, एमबीए पर्यत शिक्षण घेतले असून त्यांनी समाजशास्त्रामध्ये पीएचडी प्राप्त केलेली आहे. शिक्षक बनण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने त्यांनी मोठय़ा जिद्दीने शिकवणी वर्ग सुरू केले. त्यांनी सुरू केलेल्या ओम साईराम कोचिंग वर्गाच्या माध्यमातून गोव्याच्या विविध भागातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना विनामुल्य ते मार्गदर्शन गेली कित्येक वर्षे करीत आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही भरीव असे कार्य केले आहे. विविध शाळांना शैक्षणिक साहित्य व अन्य सुविधा पुरवण्याचे काम ते करीत आहेत.
शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये हाच ध्यास
शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने पुस्तके तसेच शिष्यवृत्ती त्यांनी दिलेली आहेत. दरवर्षी ते आपल्या वाढदिनी मातृछायातील सर्व मुलांना अन्नदान करीत आहेत. कुडाळ गावात एक आदिवासी शाळाही त्यांनी दत्तक घेतली असून त्याच गावातील एका वृद्धाला निवारा देत त्याच्या औषधावरही खर्च केला आहे. निस्वार्थीपणे केलेल्या त्याच्या या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार घोषित केला आहे. यापुर्वी त्यांना ग्लोबल एक्सलन्स पुरस्कारही प्राप्त झालेला आहे.
आठ वर्षापासून मडकईच्या विद्यार्थ्यांसाठी विनामुल्य शिकवण्या
अशोक प्रियोळकर यांचे शालेय शिक्षण घरातच पुर्ण झाले. घरची परिस्थिती अंत्यत गरिबीची होती. परंतू शिक्षण घेण्याची त्यांना जबरदस्त इच्छा होती. शिक्षण घेताना अनेक अडचणीवर मात करीत मोठय़ा जिद्दीने त्याने एम ए, एमबीए, समाजशास्त्र मध्ये पीएचडीपर्यंत मजल मारलेली आहे. त्यांना शिक्षण बनण्याची मनापासून इच्छा होती. पण ते साध्य न झाल्याने शिकत असतानाच त्यानी शिकवण्याचे (टय़ुशन) वर्ग सुरू करून ओम साई राम कोचिंग क्लासेस सुरू केले. गोव्यातील विविध हायस्कूल तसेच उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना विनामुल्य मार्गदर्शन करून त्यांना चांगल्या हुद्दयावर पोचविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. गेली आठ वर्षे मडकईच्या नवदुर्गा विद्यालयात मुलांना विनामुल्य मार्गदर्शन निस्वार्थीपणे करीत आहेत. ते ओमसाईराम या संस्थेतर्फे गेली वीस वर्षे शिकवणी वर्ग घेत आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबरच क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रात त्याचे योगदान मोलाचे आहे.
शिक्षणाबरोबरच त्यांनी समाजसेवेचा व्रत घेतलेले आहे. गोमंतकातील विविध विद्यालयांना शैक्षणिक साहित्य तसेच साधनसुविधा पुरविल्या असून विद्यार्थ्यांना स्वखर्चाने पुस्तके तसेच शिष्यवृत्ती देण्यात आल्या. प्रियोळच्या स्वास्तिक विद्यालयाला मंडप बांधणीसाठी त्याच्यातर्फे व हितचिंतकातर्फे साठ हजार रूपये देणगीच्या रूपात तसेच दहा हजार रूपये कायम स्वरूपीच्या रूपात देण्यात आले आहे. आपल्या वाढदिनी दरवर्षी मातृछायेतील मुलांना अन्नदानाचे पवित्र कार्य ते करीत आहेत. शिवाय अनेक गरजू व गरिब मुलांना आर्थिक मदत ते करीत असतात.
शिक्षणाची पताका पोचविली कुडाळपर्यंत
कुडाळ गावात एक आदिवासी शाळा त्यांनी दत्तक घेतली आहे. कुडाळ येथील रघु मडवळ या 65 वर्षीय वयस्क माणसाला त्यांनी व त्याच्या सहकाऱयांनी झोपडी बांधून देऊन त्यांचा औषधाचा खर्च उचलला. त्य़ानी आतापर्यंत नऊ वेळा रक्तदानही केले आहे. ते गोवा हिंदु असोसिएशन मुंबई, गोवा सेवा संघ मुंबई, गोमंतक बाल शिक्षण संस्था फोंडा या संस्थाचे आजीवन सदस्य आहेत. ते एक होतकरून गुणी व स्वयंरोजगाराचे उत्तम उदाहरण असून त्यांनी सामाजसेवेचा एक आदर्श प्रस्थापित केलेला आहे. अशा या युवकाचा आदर्श आजच्या समाजातील युवकांनी घ्यावा असाच आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत रोज आपल्या भाषणात सर्वांना सरकारी नोकरी देणे अवघड असल्याचे नमूद करतात. डॉ. प्रियोळकर यांनी राजकारण्याची हुजरेगिरी न करता स्वाभिमानाने स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबला. मोदी सरकारने दिलेला ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपुर्ण गोवा’ मिशन हे वीस वर्षापुर्वीच सत्यात उतरवून दाखविलेले आहे. आपली कल्पनाशक्ती उपयोगातून आणून सामान्य विद्यार्थ्यातून भविष्यातील असमान्य शिक्षक घडविण्य़ासाठी झपाटलेल्या ग्रामिण शिक्षकाला शिक्षकदिनी शुभेच्छा!