कॅशलेस पद्धतीने व्यवहार सुरू होण्यास विलंब लागण्याची शक्यता
प्रतिनिधी / बेळगाव
ग्राम पंचायतींची कार्यप्रणाली कॅशलेस पद्धतीने होण्यासाठी सरकारने स्वाईप मशीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. नागरिकांनाही ग्राम पंचायतीमध्ये कर भरताना कॅशलेस पद्धतीने कर भरणे सोपे होणार होते. मात्र, अजूनही स्वाईप मशीन उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे कॅशलेस ग्राम पंचायत होण्यास उशीर लागण्याची शक्मयता आहे.
सरकारी काम आणि बारा महिने थांब, अशी अवस्था सध्या झाली आहे. स्वाईप मशीनमुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार होता. सरकारच्या या धोरणाला यशस्वी करण्यासाठी तालुका पंचायतीच्यावतीने ग्राम विकास अधिकारी व ग्राम पंचायत अध्यक्षांना मार्गदर्शन करण्यात आले होते. स्वाईप मशीन (पीओएस मशीन) द्वारे ग्राम पंचायती कॅशलेस प्रणालीकडे वाटचाल करीत आहेत. सध्या सर्वत्रच कॅशलेस करण्याच्या मार्गाने प्रयत्न सुरू असले तरी सरकारी कार्यालयात मात्र अजूनही तशी प्रणाली नसल्याने मोठा गोंधळ निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
ग्राम पंचायतींना स्वाईप मशीन देण्यासाठी काही राष्ट्रीयीकृत बँकांनी पुढाकार घेतला होता. यासाठी लीड बँकेच्या व्यवस्थापकांचीही बैठक घेण्यात आली होती. त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला होता. ग्राम पंचायतींना कॅशलेस करण्यासाठी विविध माहिती करून देण्यासाठी तालुका पंचायतच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. तालुक्मयात प्रत्येक ग्राम पंचायतीत कॅशलेस व्यवहार सुरू झाल्यास भ्रष्टाचाराला चाप बसण्यास विलंब लागणार नाही. यामुळेच कॅशलेस व्यवहाराकडे अधिकतर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. मात्र, अजूनही स्वाईप मशीन देण्यात आली नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पीओएस मशीनद्वारे ग्राम पंचायतांकडे विविध प्रकारचे जमा करण्यात येणारे कर नागरिकांना स्वाईपद्वारे देता येणार आहेत. पीओएस मशीनद्वारे प्रत्येक व्यवहाराची नोंद सरकार दरबारी होणार असल्याने ग्राम पंचायतींमध्ये बळावलेला भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होणार आहे. ग्राम पंचायतींमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी, एनओसी यांच्यासह इतर विविध परवान्यांसाठी रक्कम भरून घेतली जाते. ती रक्कम यापुढे स्वाईप मशीनच्या माध्यमातून स्वीकारली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अजूनही स्वाईप मशीन देण्यात आली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
पीओएस मशीन वापरणे थोडे कठीण असल्याने याबाबतचे मार्गदर्शन सरकारच्यावतीने विविध माध्यमातून देण्यात येत होते. सध्या तालुका पंचायतीच्यावतीने सर्व ग्राम पंचायतींच्या पीडीओ आणि अध्यक्षांना याबाबत माहिती करून देण्यात आली होती. पीओएस मशीनच्या हाताळणीबाबत मार्गदर्शनही करण्यात आले होते.
ग्राम पंचायतींना स्वाईप मशीनचे लवकरच वितरण होणार -ता. पं. कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी
कॅशलेस व्यवहारामुळे अनेकांना याचा फायदाच होणार आहे. दरम्यान, स्वाईप मशीन बँकांकरवी तालुक्मयातील ग्राम पंचायतींना मिळणार होत्या. मात्र, त्याला आणखी थोडा अवधी लागणार आहे. कॅशलेस व्यवहारामुळे भ्रष्टाचाराला मोठय़ा प्रमाणात आळा बसणार आहे. सध्या अनेक नागरिकांनी कॅशलेस व्यवहार सुरू केला असून भविष्यात याचा फायदा होणार आहे. त्यासाठी ग्राम पंचायतींना स्वाईप मशीनचे लवकरच वितरण करण्यात येणार असल्याचे कलादगी यांनी सांगितले.