प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायतींच्या निवडणुका मोठय़ा चुरशीने पार पडल्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे साऱयांचेच लक्ष लागले होते. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत तारखा जाहीर झाल्या असून मोर्चेबांधणीला जोर आला आहे. तालुक्मयातील विविध ग्राम पंचायतींच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ही मोर्चेबांधणी सुरू झाली. आता तारीख जाहीर झाल्याने आणखी मोर्चेबांधणीला जोर चढला आहे.
तालुक्मयातील विविध ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. ग्राम पंचायत पीडीओ, निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत ही निवड होणार आहे. राज्य सरकारने दि. 5 फेब्रुवारीपर्यंत या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुका पंचायतच्या माध्यमातून निवडणुकांची तारीख निश्चित करून देण्यात आली आहे. दि. 1 फेब्रुवारीपासून या निवडणुकांना सुरुवात होणार आहे.