प्रतिनिधी/ बेळगाव
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर मतमोजणी झाली असून आकडेवारींची अजूनही जुळवाजुळव सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने सध्या जिल्हय़ातील 477 ग्राम पंचायतींमधील 8195 सदस्य संख्येतील 8159 सदस्य विजयी झाले आहेत. यामध्ये 781 बिनविरोध निवडून आले आहेत. तर आणखी 26 जागांचे निकाल विविध कारणांनी लागला नाही.
बेळगाव तालुक्मयातील 55 ग्रा. पं. च्या 1037 ग्रामपंचायत सदस्य संख्येपैकी 1035 सदस्यांचा निकाल लागला आहे. खानापूर तालुक्मयातील 51 ग्रा. पं. मधील 623 सदस्यांपैकी 621 सदस्यांचा निकाल लागला आहे. त्याचबरोबर इतर तालुक्मयातील काही ठिकाणचे निकाल अजूनही लागले नाहीत. एकूण 477 ग्राम पंचायतांच्या 8195 जागांपैकी 8169 जागांचा निकाल लागला आहे. तर 26 जागांचा अजूनही बाकी आहे.