ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जागतिक बाजारातील इंधन दरवाढीचा भार सोसणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी ग्राहकांना किंचित दिलासा दिला. आज कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थेच ठेवल्या आहेत. याआधी काल सोमवारी तीन महिन्यानंतर कंपन्यांनी डिझेल दरात कपात केली होती.
आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 107.20 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव 101.92 रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल 101.35 रुपये झाले आहे.
मुंबईत डिझेलचा भाव 97.29 रुपये आहे. दिल्लीत डिझेल 89.72 रुपये झाले आहे. चेन्नईत 94.24 रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव 92.81 रुपये प्रती लीटर झाला आहे. यापूर्वी सोमवारी डिझेल 16 पैशांनी स्वस्त झाले होते पेट्रोल 28 पैशांनी महागले होते. तर रविवारी इंधन दर स्थिर ठेवले होते.
- ‘या’ शहरात शंभरी पार
देशातील सर्व महानगरातील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत.