वृत्तसंस्था/ मुंबई
ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्याप्रती तसेच जागतिक दर्जाची उत्पादने सादर करुन उद्योगातील बांधिलकी आणखी मजबूत करत, टाटा मोटर्स या भारतातील सर्वांत मोठय़ा व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने 23 ते 31 ऑक्टोबर 2020 या काळात ‘ग्राहक संवाद 2020’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
टाटा ग्राहक सेवा महोत्सवाच्या माध्यमातून 1 ते 30 नोव्हेंबर 2020 या काळात देशव्यापी सर्व्हिस अभियान राबवणार आहे. 23 ऑक्टोबर 2020 रोजी नॅशनल कस्टमर केअर डे साजरा करणार आहे. कंपनीच्या उपक्रमांमध्ये ग्राहक प्रतिसाद (फीडबॅक) सत्रे, चॅनल पार्टनर्सचा सत्कार आणि टाटाच्या सर्व व्यावसायिक वाहनांसाठी राष्ट्रव्यापी तपासणी शिबिरे आदींचा समावेश आहे. या उपक्रमांना मोठय़ा प्रतिसादाची अपेक्षा आहे.