प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 70 ग्रामपंचायतींच्या 600 जागांसाठी प्राप्त 1550 उमेदवारी अर्जांपैकी 15 अर्ज अवैध, तर 342 उमेदवारांनी माघार घेतल्याने 1,087 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 15 जानेवारीला मतदान होणार असून या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी आमने सामने लढत होणार आहे.
जिल्हय़ातील 431 ग्रामपंचायतींपैकी मुदत संपलेल्या 70 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारीला होत असून 18 रोजी मतमोजणी होणार आहे. 70 ग्रामपंचायतींचे 226 प्रभाग असून 600 जागा आहेत. या जागांसाठी 1550 उमेदवारी अर्ज आले होते. त्यानंतर अर्ज छाननीमध्ये 15 अर्ज अवैध ठरले, तर 342 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे आता 1087 उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर लढवली जात नसली, तरी सर्वच राजकीय पक्षांनी ती प्रति÷sची केली आहे.