प्रतिनिधी/ बेळगाव
सरकारने निवडणुका जाहीर केल्या नसल्या तरीही अनेकांनी घुडघ्याला बाशिंग बांधले आहे. कोरोनामुळे मे महिनाअखेर होणाऱया ग्राम पंचायत निवडणुका आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राम पंचायतींवर आता सरकारनियुक्त अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱयांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तालुका पंचायतमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका पंचायतीच्या सभागृहात मंगळवारी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ज्यांची ग्राम पंचायतीवर नियुक्ती झाली आहे ते सर्व जण या ठिकाणी उपस्थित होते. ग्राम पंचायत निवडणुका होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्मयातील बहुदा ग्राम पंचायतांचा कार्यकाल जुलै महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या ग्राम पंचायतींवर प्रशासकीय समिती कार्यरत असणार आहे. या समितीद्वारेच ग्राम पंचायतींचा कार्यभार कसा सांभाळावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
बेळगाव तालुक्मयात एकूण 59 ग्राम पंचायती आहेत. त्यामधील दोन ग्राम पंचायतींचा कार्यकाल 2021 मध्ये संपणार आहे. तर 57 ग्राम पंचायतींचा कार्यकाल जुलैमध्ये संपणार आहे. त्यामुळे ज्या प्रशासकीय अधिकाऱयांची ग्राम पंचायतीवर नियुक्ती झाली आहे त्यांनी ग्राम पंचायतीचा कारभार कशा प्रकारे सांभाळावा आणि अडचणी आल्यास त्या दूर कशा कराव्यात, याचे मार्गदर्शन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देण्यात आले. यावेळी अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.