यंदा कोरोनामुळे फटाक्मयांची विक्री देखील कमी होत असल्याचे चित्र
बेळगाव / प्रतिनिधी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा दिवाळीच्या कालावधीत हिरवे फटाके वापरता येतील असे सांगितले होते. दरम्यान ग्रीन फटाके नेमके कोणते? याबद्दलचा संभ्रमही कायम आहे. त्यानुसार बाजारात ग्रीन फटाके म्हणजेच कमी प्रदुषणाचे फटाके उपलब्ध झाले असून या फटाक्मयांची विक्री होताना दिसत आहे.
शहरात गणेशोत्सव काळात फटाक्मयांची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. मात्र फटाके विपेत्यांचा यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव काळातील सीझन पूर्ण वाया गेला आहे. त्याचबरोबर सध्या फटाक्मयांची विक्री देखील कमी होत असल्याचे पहायला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी मागविलेले फटाके अद्याप शिल्लक असल्याची माहितीही विपेत्यांनी दिली. व्यापाऱयांनी यंदा नवीन माल मागविला नाही. उपलब्ध असलेल्या फटाक्मयांची विक्री केली जात आहे. त्यातच इतर फटाके न विकता ग्रीन फटाके ग्राहकांना दिले जात आहे.
दिवाळीत दरवषी गांधी भवन, धर्मवीर संभाजी उद्यान, नाथ पै चौक, शहापूर, सरदार गाऊंड आदी ठिकाणी फटाक्मयांचे विशेष स्टॉल उभारून विक्री केली जात होती. मात्र यंदा कोरोनामुळे हे सर्व स्टॉल बंद ठेवण्यात आले आहेत. व्यापाऱयांनी स्वतःसह कुटुंबीय आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून सरकारी आदेशाचे पालन करत असल्याचे व्यापाऱयांनी सांगितले.
पारंपरिक फटाक्मयांचा आकार लहान असतो. ते कमी हानीकारक कच्चा माल वापरून तयार केले जातात. त्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात प्रदूषण होते. लिथियम, आर्सेनिक, बोरियम आणि शिसे यासारख्या घातक रसायनांचा वापर हिरव्या फटाक्मयांमध्ये केला जात नाही. अशा हानीकारक नसलेल्या फटाक्मयांची विक्री सुरू आहे.