ऑनलाईन टीम/तरुण भारत
तामिळनाडू येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. तर या अपघातात एकमेव बचावले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याचे भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ८ डिसेंबर रोजी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात वरुण सिंग एकमेव बचावले आहेत. ग्रुप कॅप्टन सिंग यांच्यावर बेंगळूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. “वरुणच्या तब्येतीत चढ-उतार होत आहेत, परंतु एक सैनिक असल्याने तो ही लढाई जिंकेल, असा मला विश्वास आहे,” असं भोपाळ येथे राहणारे त्यांचे निवृत्त वडील कर्नल केपी सिंग यांनी म्हंटल आहे.