गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा आरोप
प्रतिनिधी/ मडगाव
सरकारने जनतेला अंधारात ठेवून आपल्या फायद्यासाठीची कृत्ये करण्याचा सपाटा लावला असून एकीकडे कोळसा व रेल्वे दुपदरीकरणाला विरोध होत असताना ग्रेटर पणजी पीडीएच्या सीमा विस्तारण्याचा घाट घातला जात आहे. वारसास्थळ असलेल्या ओल्ड गोवा येथील चर्चपर्यंत हा विस्तार करण्याचे नियोजन आहे. जनतेने यासंदर्भात सतर्क होण्याची गरज आहे. आपल्या पक्षाचा या सीमा विस्तारास विरोध आहे. 3 डिसेंबरच्या सेंट झेवियर फेस्ताच्या आधी सरकारने हा सीमा विस्तार प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी उचलून धरली आहे.
फातोर्डा येथील पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील मागणी उचलून धरली. आपण नगरनियोजनमंत्री असताना ग्रेटर पणजी पीडीए सीमा विस्ताराचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यावेळी त्यास विरोध झाला होता व तो गोवा व जनतेच्या हितार्थ नसल्याने आपण स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला होता, असे सरदेसाई यांनी नजरेस आणून दिले.
खोर्लीपर्यंत विस्ताराची योजना
ग्रेटर पणजी पीडीए ताळगाव, बांबोळीचा काही भाग यापुरती मर्यादित आहे. आता खोर्लीपर्यंत विस्तार करण्याचा घाट घातला जात आहे. ओल्ड गोवा येथील वारसास्थळ असलेल्या चर्चपासून 100 मीटरपर्यंत हा विस्तार करण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा सरदेसाई यांनी केला. सध्या 9 मीटरपर्यंत उंची असलेले प्रकल्प उभारणे शक्मय आहे. सीमा विस्तारित झाल्यास तब्बल 30 मीटर उंचीच्या इमारती उभ्या राहतील व वारसास्थळाचे अस्तित्व धोक्मयात येईल, असे सरदेसाई यांनी सांगितले.
अन्यथा भाविकांनी पावले उचलावीत
आजपासून सेंट झेवियर फेस्तानिमित्त नोव्हेनांना सुरुवात झालेली असतानाच हा सीमा विस्ताराचा घाट घातला गेला असून तो मार्गी लावण्याचा नाद सरकार व नगरनियोजनमंत्री बाबू कवळेकर यांनी सोडावा व 3 डिसेंबरच्या फेस्ताआधी हा प्रस्ताव स्थगित वा रद्द करत असल्याची घोषणा करावी. अन्यथा फेस्ताला उपस्थिती लावणाऱया भाविकांनी या सीमा विस्तारास विरोध दर्शविण्यासाठी पावले उचलण्याची गरज सरदेसाई यांनी व्यक्त केली.