ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली पोलिसांनी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी आंदोलनाबद्दल भडकाऊ ट्विट केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
पॉप गायिका रिहानानंतर, पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेक जागतिक ख्यातनाम व्यक्तींनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले. यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण आधी वस्तुस्थिती तपासून घ्यावी, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.
रिहानाच्या ट्वीटनंतर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केले. ग्रेटा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, आम्ही भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांसोबत एकतेने उभे आहोत. ज्यांना मदत हवी आहे, त्यांच्यासाठी टूलकिट शेअर (सॉफ्टवेयर) केले आहे. ग्रेटा थनबर्गला 2019 मध्ये अमेरिकन मॅगझिन टाईम्सने ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले होते.
- एफआयआर नोंदवल्यानंतर ग्रेटा थनबर्ग म्हणाली …
दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवल्यानंतर आता ग्रेटा थनबर्गने टि्वटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. मी शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांच्या शांतीपूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. कुठलाही द्वेष, धमकी किंवा मानवी हक्काच्या उल्लंघनामुळे यात बदल होणार नाही, असे ग्रेटा थनबर्गने म्हटले आहे.