बेंगळूर
औषध क्षेत्रातील कंपनी ग्लँड फार्मा कंपनीने 31 डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत 273 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. हा नफा मागच्या तुलनेत 34 टक्के अधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे. कंपनीच्या उत्पादनांना विविध बाजारपेठांमध्ये विक्रीमध्ये चांगला प्रतिसाद लाभल्याचा परिणाम नफा वाढीत दिसला. कंपनीचा महसूल याच काळात 1063 कोटी रुपयांचा राहिला आहे. जो मागच्या आर्थिक वर्षात 2020-21 समान अवधीत 859 कोटी रुपये राहिला होता.