नवी दिल्ली
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस यांचा आयपीओ येत्या 27 जुलैला सादर केला जाणार आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी 1060 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. सदरचा आयपीओ 27 जुलैला खुला होऊन 29 जुलैला बंद होणार आहे. सदरची कंपनी ही फार्मा क्षेत्रातील कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सची सहकारी कंपनी आहे. याआधी कंपनीने 1600 कोटी उभारण्याचे निश्चित केले होते. कंपनीचे समभाग 6 ऑगस्टला शेअर बाजारात सुचीबद्ध होण्याची शक्यता सांगितली जात आहे.