कळंबोली येथे सापळा रचून शाहूपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर / प्रतिनिधी
गुंतवणुकीवर 15 टक्के परतावा देण्याच्या अमिषाने शहरासह जिह्यातील शेकडो गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱया ग्लोब्झ ट्रेडींगच्या मुख्य सुत्रधारास शाह्tपुरी पोलिसांनी अटक केली. कळंबोली येथे तीन दिवस सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. विश्वास निवृत्ती कोळी (वय 45 रा. बावची ता. वाळवा) असे त्याचे नांव आहे. न्यायालयाने त्यांना 9 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
याबाबतची फिर्याद रघुनाथ शंकर खोडके यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांची 41 लाख 8 हजार 270 रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी उज्वला शिवाजी कोळी, स्वप्निल शिवाजी कोळी, सौरभ कोळी, सोमनाथ कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद रघुनाथ शंकर खोडके (वय 32, रा.हारपवडे, ता. पन्हाळा) यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संशयीत आरोपींनी ग्रोबझ ट्रेडिंग सर्विसेस कंपनी सुरू केली होती. शाहुपूरी चौथ्या गल्लीतील स्वस्तिक हाऊस येथे त्यांनी कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास 10 महिन्यांमध्ये 15 टक्के परताना देण्याचे आमिष त्यांनी खोडके यांना दाखवले. मात्र ठरलेला परतावा त्यांना मिळाला नाही. आपली 41 लाख 8 हजार 270 रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाचही जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 9 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास शाहुपूरी पोलिस करत आहेत.
फसवणूकीच्या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत यामध्ये एकजण फिर्यादी आले आहेत. ज्या नागरीकांची फसवणूक झाली आहे. त्यांनी धाडसाने पुढे येवून शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी केले.