तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
दक्षिण सोलापुरातील वांगी नजीकच्या ठेंगीलवाडी गावची एक व्यक्ती ग्वाल्हेरला गेल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याचे ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले होते. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ठेंगीलवाडीसह पाच गावे सील करण्यात आली आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 46 व्यक्तींचे स्वॅप घेऊन तपासणी करण्यात आली आहे. याचा अहवाल शुक्रवारी संध्याकाळी पर्यंत मिळेल अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
दक्षिण सोलापूर येथील वांगी गावातील ठेंगील वाडी , गावडेवाडी, कांबळवाडी, खांडेकर वस्ती, पांगळेवाडी, येळगाव या गावातील व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून ही गावे सील करण्यात आली आहे. याठिकाणी आवागमन बंद करण्यात आले आहे . या सहा गावातील एकूण 611 घरातील 3334 जनाची या पंधरा टीमच्या पथकाने तपासणी केलेली आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले 46 व्यक्ती व्यक्तींना आयसोलेशन वार्डात ऍडमिट केले असून त्यांचे स्वॅप घेऊन पुढील तपासणी करण्यात येत आहे. याचा रिपोर्ट शुक्रवारी संध्याकाळी पर्यंत येईल त्यानंतर पुढील कारवाई होईल असेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 700 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये होत्या. त्यापैकी 405 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर उर्वरित 295 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आयसोलेशन वार्डात 194 रुग्ण दाखल होते. त्यापैकी 140 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 54 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहे. वांगी येथील 46 व्यक्तीचा समावेश आहे. एकंदरीत आजआखेर सोलापूर जिल्ह्यात एकही व्यक्ती कोरोनाबाधित नसल्याचे शंभरकर यांनी सांगितले. इन्स्टिट्यूशनल व्यक्ती 204, त्यापैकी 83 जणांचा कालावधी पूर्ण केलेल्या, 121 व्यक्ती अद्यापही इन्स्टिट्यूशनलमध्ये आहेत. असेही शंभरकर यांनी सांगितले.