चेकपोस्टवर तपासणी करताना आढळली रक्कम : प्राप्तिकर विभागाकडे तपासकार्य
प्रतिनिधी / बेळगाव
घटप्रभाजवळ बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर बुधवारी मोठी रक्कम जप्त करण्यात आली. कोणतीही कागदपत्रे नसताना रक्कम नेताना अधिकाऱयांनी 42 लाख 71 हजार रुपये जप्त केले आहेत.
घटप्रभा तपास नाक्मयाजवळ महाराष्ट्रातून आलेल्या कारची तपासणी करताना कारमध्ये मोठी रक्कम आढळून आली. ही कार मंगसुळीहून यरगट्टीकडे जात होती. सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू आहे. ही रक्कम कोठून आणली, असा प्रश्न अधिकाऱयांनी संबंधितांना विचारला. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी केली.
42 लाख 71 हजार रुपयांसंबंधी कागदपत्रे हजर करण्यास ते असमर्थ ठरल्याने अधिकाऱयांनी ही रक्कम जप्त केली. जप्त केलेली रक्कम ट्रेझरीला पाठविली असून हे प्रकरण पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठविले आहे. उमेश मनगुळी यांच्या नेतृत्वाखालील एसएसटी पथकाने ही कारवाई केली आहे.