श्री तुळजाभवानी ऑनलाईन दर्शनासाठी (www.shrituljabhavani.org) हे संकेत स्थळ उपल्बध
प्रतिनिधी / उस्मानाबाद
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे शनिवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारीक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते आज विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने, आई राजा उदो- उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले.
यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाच्या मुख्य पुजेचा मान यशराज मुकूंद कदम यांना मिळाला. त्यांनी मंदिरात विधिवत पूजन केले. त्यानंतर घटकलशाची पारंपरिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तिर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात आली.
मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेत स्थळावर ( www.shrituljabhavani.org ) ऑनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी दर्शन सुविधेचा लाभ घरी बसुनच घ्यावा असे आवाहन करुन सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.
यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले उपविभागीय अधिकारी श्री सचिन गिरी आदी उपस्थित होते. याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गौंधळी यावेळी उपस्थित होते.
Previous Articleसोलापूर : तीन जिल्ह्यातून वैराग भागातील दोघे तडीपार
Next Article सोलापूर शहरात 24 कोरोना पॉझिटिव्ह
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.