दुचाकीला कारने धडक मारून केला होता प्रयत्न : काकती स्थानकातील 16 पोलीस क्वारंटाईनमध्ये
प्रतिनिधी/ बेळगाव
आपल्या घटस्फोटीत पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून काकती पोलिसांनी अटक केलेल्या वीरभद्रनगर येथील एका युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे काकती पोलीस स्थानकातील त्याच्या थेट संपर्कातील सहा पोलिसांसह एकूण 16 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
कॅम्प पोलिसांनी अटक केलेल्या लुटमार प्रकरणातील एका 29 वषीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच अशाच एका आरोपीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 3 जून रोजी मजगाव येथील 29 वषीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानक सीलडाऊन करण्यात आले होते.
बुधवारी वीरभद्रनगर येथील एका 38 वषीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 6 जुलै रोजी काकती पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच दिवशी न्यायालयात हजर करण्यापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. बुधवारी सकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
30 जून रोजी भुतरामहट्टीजवळ मोटारसायकलवरून जाणाऱया आपल्या घटस्फोटीत पत्नीच्या अंगावर कार घालून खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेत एकूण पाच जण जखमी झाले होते. स्वतः तो 38 वषीय तरुणही जखमी झाला होता. तेव्हापासून शिवबसवनगर येथील एका खासगी इस्पितळात तो उपचार घेत होता.
अन्नपूर्णावाडी येथे राहणाऱया एका महिलेशी या युवकाने लग्न केले होते. त्याने घटस्फोट दिल्यानंतर त्या महिलेने दुसरे लग्न केले होते. दुसऱया पतीला घटस्फोट देऊन पुन्हा माझ्याशी लग्न कर, असा दबाव तो आणत होता. तिने नकार दिल्यामुळे 30 जून रोजी भुतरामहट्टीजवळ मोटारसायकलला कारने धडक मारून तिच्या खुनाचा प्रयत्न त्याने केला होता.
2 जुलै रोजी यासंबंधी त्या 38 वषीय युवकावर भा.दं.वि. 307, 504, 506 कलमान्वये एफआयआर दाखल केला होता. या अपघातात स्वतः तो युवकही जखमी झाला होता. त्याच दिवशी शिवबसवनगर येथील एका खासगी इस्पितळात त्याला दाखल केले होते. 6 जुलै रोजी डिस्चार्ज मिळताच काकती पोलिसांनी अटक केली होती.
पोलीस स्थानक परिसराचे सॅनिटायझेशन
यासंबंधी कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या युवकाला अटक करून न्यायालयात हजर करण्यापर्यंत थेट परिस्थिती हाताळलेल्या सहा जणांसह एकूण 16 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पोलीस स्थानक परिसर सॅनिटायझेशन करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.