प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाची गडद छाया यंदाच्या गणेश उत्सवावर पसरली आहे.बाजारपेठेत गणरायाच्या विविध रुपातील घरगुती मुर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. मात्र मुर्ती खरेदीला थंड प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विक्रेते संकटात सापडले आहेत.
’गणपती बाप्पा मोरया’ असा गणरायाच्या आगमनाचा जयघोष दरवर्षी सगळीकडे सुरु असतो. महिनाभर आधी घराघरात तयारी सुरु होते. कुंभारवाडय़ात मुर्तीकाराचे रंगरंगोटीचे काम पूर्ण झालेले असते. घरगुती गणपती मुर्ती सोबत गणेश मंडळाच्या मुर्ती आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेल्या असतात. सजावटीचे साहित्यांनी दुकाने भरुन जातात. लहान मुले ते जेष्ठ सगळेच हा उत्सव साजरी करण्यासाठी धडपड असतात. यंदाही गणेशोत्सव 22 आँगस्टला साजरी होणार आहे. अवघ्या 13 दिवसावर आलेल्या या सणावर कोरोनाची गडद छाया पसरली आहे. मार्च महिन्यात लागू झालेला लाँकडाऊनमुळे मुर्ती बनवण्यासाठी कच्च्या माल उपलब्ध झाला नाही. तर गणेश मंडळानी मुर्ती बनवण्याच्या आँर्डर दिल्या नाहीत. यामुळे यंदा गणेशोत्सव साजरी होणार का ? असा प्रश्न उभा होता. तोच लाँकडाऊन शिथील झाल्याने विक्रेत्यांनी मूर्ती विक्रीचे स्टाँल उभारले आहेत. स्टाँलवर मूर्तीची संख्या कमी आहे.प्लास्टर आँफ परिस च्या मूर्ती सोबत शाडुच्या मूर्ती आहेत. यांच्या किंमती 1 हजार ते 3 हजार पर्यंत आहेत. मात्र कोरोनामुळे बरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. खिशाला परवडणा-या किंमतीत असणाया मूर्ती खरेदीवर भर दिला जात आहे. परंतु अद्याप सणाचा उत्साह वाढला नाही. यामुळे मूर्ती खरेदीला थंडच प्रतिसाद मिळत आहे.