नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशात कोरोना माहामारीने थैमान घातले असतानाच वाढत्या महागाईने देखील जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला सतावत आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडल्यानंतर एलपीजीच्या किंमतीही गेल्या काही महिन्यांत वाढल्याचे दिसून येत आहेत. यावर कॉंग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी है, तो मुमकिन है, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधाल आहे. यासोबतच त्यांनी महागाई कशी हे देखील सांगितले आहे.
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्वीट करत मोदी सरकारच्या काळातील 2020 ते 2021 या काळातील एलपीजीच्या वाढत्या किंमतीवर प्रकाश टाकला आहे. मोदी सरकार आणि एलपीजीचे दर 2020 ते 2021 पर्यंत नोव्हेंबर 2020 मध्ये 594 रुपये ते 1 जुलै 2021 पर्यंत 834 रुपये इतके झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी शेवटी यांनी ‘मोदी है, तो मुमकिन है’, असे म्हणत मोदी सरकारला वाढत्या महागाईवरून टोला लगावला आहे.
तेल कंपन्यांनी देशांतर्गत एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. आता दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत 834.50 रुपये इतकी असणार आहे. सुधारित दर 1 जुलैपासून लागू असतील.