विवाहासाठी सारा अली खानची अट
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान स्वतःच्या आईबद्दलचे प्रेम व्यक्त करताना वारंवार दिसून येते. माझी आईच बेस्ट प्रेंड असून तिच्याशिवाय राहू शकत नसल्याचे ती सांगते. विवाहानंतर देखील मी आई अमृता सिंह सोबत राहणार आहे. जर कुणाला माझ्याशी विवाह करायचा असल्यास त्याला माझ्या आणि अमृतासोबत माझ्याच घरात रहावे लागणार असल्याचे साराचे म्हणणे आहे.
सारा सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’चे प्रमोशन करत आहे. जोपर्यंत माझी आई कपडय़ांचे मॅचिंग करत नाही तोवर मी घराबाहेर पडत नाही. आईपासून दूर पळण्याची माझी तयारी नाही. माझ्या आणि आईसोबत राहणाऱया व्यक्तीशीच मी विवाह करणरा आहे. आईला मी कधीच सोडणार नाही. आई म्हणजे माझा तिसरा डोळा असल्याचे उद्गार तिने काढले आहेत. अमृता सिंह आणि तिचा भाऊ इब्राहिमसोबत सारा अनेकदा व्हेकेशनवर जात असते.