प्रतिनिधी/ महाबळेश्वर
मागील वर्षी पालिकेने केलेली बेकायेदशीर संकलितकर वाढ मागे घ्यावी व पुर्वीच्याच दराने संकलित कराची बीले दयावी आणि लॉकडाउनच्या काळात वाणिज्य दराने पाणी बील आकारणी न करता वाणिज्य बीले घरगुती दराने आकारणी करावी अशी मागणी येथील दोन्ही हॉटेल संघटनेने पालिकेला केली आहे या संदर्भात दोन्ही संघटनांची संयुक्त बैठक पार पडली व या बाबत एकत्र लढा देण्याचाही निर्णय त्यांनी घेतला आहे
हॉटेल सनी इंटननॅशनल येथे येथील दोन्ही संघटनांची बैठक पार पडली या वेळी माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर मोठया हॉटेल संघटनेचे अध्यक्ष मनिष तेजाणी व छोटया हॉटेल संघटनेचे अध्यक्ष असिफ सयद आदींसह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते याच बैठकीत घरपट्टीd पाणीबिले व विजबिले या संदर्भात सविस्तर चर्चा झाली
पालिकेने चतुर्थ वार्षिक कर आकारणी करताना हॉटेल व लॉज यांचे तीन गटात वर्गीकरण केले व त्या नुसार प्रत्येक गटाचे वेगवेगळे दर ठरवुन कर आकारणी केली या आकारणी मुळे काही हॉटेल व्यवसायिकांच्या करात अनेक पटींनी वाढ झाली कर वाढ करताना चाळीस टक्क्यां पेक्षा अधिक करवाढ करता येत नाही हे साधे सुत्र आहे परंतु पालिकेने कर आकारणी करताना हा नियम पुर्णपणे धाब्यावर बसविला त्या मुळे काहींच्या बिलात शेकडो टक्के करवाढ झाली ही वाढ अन्याय कारक असल्याने अनेक हॉटेल व्यवसायिकांनी या करवाढी विरोधात न्यायालयात जाणे पसंत केले त्याच वेळी पालिकेने या करवाढीचा पुर्नविचार करावा अशी मागणी केली परंतु पालिका आपल्या निर्णयावर ठाम राहील्याने या करवाढीचा पेच कायम राहीला आहे नियम धाब्यावर बसवुन केलेली करवाढ ही वादग्रस्त ठरली आहे सध्या कोरोनाचे संकटामुळे मार्च पासुन येथील सर्व हॉटेल व्यवसाय पुर्ण पणे बंद आहे कोणालाही व्यवसाय नाही अशा वेळीतरी पालिकेने भरमसाठी केलेल्या घरपट्टीd वाढीचा पुर्नविचार करून करवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली आहे
प्रत्येक हॉटेल व लॉज मध्ये पालिकेचे पाण्याचे कनेक्शन आहे या पाण्याचे दर आकारणी वाणिज्य दराने केली जाते सध्या कोरोनामुळे मार्च पासुन पर्यटन व्यवसाय बंद आहे त्या मुळे या पाण्याचा वापर हा घरगुती केला जात आहे असे असले तरी पालिकेने पाण्याची बिले ही वाणिज्य दराने आकारणी केली आहे मार्च पासुन केलेली पाणी बिलाची वाणिज्य दर आकारणी रद्द् करण्यात यावी पाण्याची बिले घरगुती दराने आकारणी करण्यात यावी अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली आहे
या दोन मागण्या पालिकेने मंजुर केला तर हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे व्यवसाया अभावी हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे त्यात करवाढीचा शॉक हॉटेल व्यवसायिकांना सोसनार नाही अशी प्रतिक्रिया हॉटेल व्यवसायिक व्यक्त करीत आहेत