महत्वाच्या बैठकीसाठी आयुक्त गेल्याने सोमवारी भेट घेणार
प्रतिनिधी / बेळगाव
वाढीव घरपट्टीमुळे मालमत्ताधारकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. कोरोनामुळे नागरिकांना घरी बसावे लागत असल्याने घरपट्टी वाढ रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्याकरिता माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळ शुक्रवारी महापालिकेत गेले होते. मात्र महापालिका आयुक्त एका महत्वाच्या बैठकीला गेले असल्याने भेट होवू शकली नाही. त्यामुळे सोमवारी भेट घेवून करवाढ रद्द करण्याचे निवेदन देण्यात येणार आहे.
घरपट्टीत 15 टक्क्मयाने वाढ करण्यात आली आहे. मात्र वसुली 25 ते 30 टक्क्मयापर्यत करण्यात येत आहे. घरपट्टी भरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना 25 ते 30 टक्क्मयापर्यत वाढ करून चलन देण्यात येत आहे. त्यामुळे नेमकी घरपट्टी वाढ किती असा मुद्दा उपस्थित झाला आहे. वाढीव घरपट्टीबाबत महापालिका कार्यालयात नागरिक चौकशी करण्यासाठी जात आहेत. पण महापालिकेच्या सर्व अधिकाऱयांना कोरोना पार्श्वभुमीवर विविध कामांना जुंपण्यात आले असल्याने कार्यालयात कोणीच अधिकारी उपस्थित नाहीत. त्यामुळे घरपट्टी वाढीबाबत मनपा कार्यालयात गेलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. त्यामुळे घरपट्टी भरायची की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काही नागरिकांनी घरपट्टी वाढीबाबत माजी नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत. कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने दोन महिन्यापासून नागरिक घरीच बसुन आहेत. सर्व व्यवसाय बंद आहेत, नोकरदारांना देखील घरी बसावे लागत आहेत. अशातच घरपट्टी वाढल्यामुळे मालमत्ताधारकांवर आर्थिक भुर्दंड वाढला आहे.त्यामुळे घरपट्टी वाढ रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्याकरिता माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह माजी नगरसेविका सुधा भातकांडे, माजी नगरसेवक विजय भोसले, राजु बिर्जे, मनोहर हलगेकर आदी माजी नगरसेवकांचे sिशष्टमंडळ शुक्रवारी महापालिका आयुक्त जगदीश के.एच. यांना भेटण्यासाठी गेले होते. पण अचानक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याने महापालिका आयुक्त जगदीश के.एच. यांना जावे लागले. त्यामुळे आयुक्तांची भेट होवू शकली. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अधिकाऱयांना धावपळ करावी लागत असल्याने मनपा कार्यालयात महसुल उपायुक्तासह अन्य अधिकारी भेटू शकले. नाहीत. त्यामुळे माजी महापौर सरिता पाटील यांनी महापालिका आयुक्त जगदीश के.एच आणि महसुल उपायुक्त एस.बी. दोड्डगौडर यांना संपर्क साधला. पण बैठकीत असल्याची माहिती दिली. त्यामुळे सर्व माजी नगरसेवकांसमवेत सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.