आमदार चंद्रकांत जाधव यांची महापालिका प्रशासक डॉ. बलकवडे यांना सूचना
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील घरफाळा आणि पाणीपट्टी थकबाकीवरील दंडाच्या रकमेत पन्नास टक्के सवलत देण्यात यावी, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना केली आहे. थकबाकीवरील दंडात सूट दिल्यास घरफाळा वसुलीही वेगाने होईल. तसेच नागरिकांनाही दिलासा मिळेल, असे आमदार जाधव यांनी म्हटले. प्रशासक डॉ. बलकवडे यांनी या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.